तुम्हाला आठवतोय का तो व्यक्ती ज्यानं एका बारबालावर तब्बल 93 लाख रुपये उधळले होते. एवढी उधळपट्टी करणारा हा व्यक्ती कोण म्हणून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. शेवटी एका प्रकरणात तो सापडला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर जे समोर आलं ते चक्रावून टाकणारं होतं. अब्दुल करीम तेलगी असे त्या व्यक्तीचे नाव होते. एक फळविक्रेता असणारा माणून जेव्हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा करतो तेव्हा ते धक्कादायक असचं होत. गेल्या वर्षी स्कॅम 1992 मधील आरोपी हर्षद मेहता याच्यावर आलेल्या वेबसीरिज नंतर त्याचा दुसरा भाग आता तयार होणार आहे.
#webserise #scam #harshadmehta #hansalmehta